July 20, 2025 3:31 PM July 20, 2025 3:31 PM

views 4

इंधन तेल खाणींचा शोध घेण्यासाठी १० लाख चौरस किमी समुद्री क्षेत्र खुलं !

सद्यस्थितीत दहा लाख चौरस किलोमीटर इतका सागरी प्रदेश तेल इंधनाच्या खाणींच्या शोधासाठी खुला केला असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी समाजमाध्यमांवरून दिली आहे. याबरोबरीनंच ९९ टक्के नो-गो क्षेत्र देखील अशा शोधासाठी खुलं केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. उद्योजक आणि उद्योग क्षेत्रातल्या दिग्गजांनी भारतातील तेल इंधन आणि वायू इंधन उत्खनन क्षेत्रातील संधी चाचपडून पाहण्यासाठी हा उत्तम काळ असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अशा प्रत्येक उपाययोजनांमधून भारत तेल...

June 23, 2025 1:01 PM June 23, 2025 1:01 PM

views 2

भारताकडे पुरेसा तेलसाठा असल्याचा हरदिपसिंग पुरी यांचा विश्वास

भारताकडे तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून गेल्या दोन आठवड्यातील पश्चिम आशिया भागातल्या भुराजकीय परिस्थितीकडे भारत सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे, असं केंद्रिय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने गेल्या काही वर्षांत आपल्या कच्च्या तेल आयाती संदर्भातील पुरवठा साखळीत विविधता आणली आहे आणि आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणात पुरवठा होत नाही. तसंच भारतीय तेल विपणन कंपन्यांकडे अनेक आठवडे पुरेल एवढा तेल साठा उपलब्ध आहे. भारतीय नागरिकांना इंधनाचा पुर...

April 8, 2025 8:55 PM April 8, 2025 8:55 PM

views 3

अमेरिकेनं आयात करणाऱ्या वस्तूंवर लादलेल्या करांंची काळजीपूर्वक पडताळणी करण्याची गरज-हरदीप सिंग पुरी

अमेरिकेनं आयात करणाऱ्या वस्तूंवर लादलेल्या करांंची काळजीपूर्वक पडताळणी करण्याची गरज आहे. या करांचे परिणाम दिसू लागल्याशिवाय घाईगडबडीत कुठलाही निर्णय घेतला जाऊ नये असं मत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केलं आहे. अशाप्रकारच्या करांचे विविध उद्देश आणि विविध परिणाम असतात. त्यामुळं नीट समजून घेऊन, काळजीपूर्वक याकडे पाहण्याची गरज आहे आणि वाणिज्य मंत्रालय परिस्थितीचा योग्य आढावा घेत आहेष असं ते म्हणाले. विरोधकांनीही नीट समजून घेऊन या विषयावर बोलावं, असा सल्ला त्यांनी द...

February 27, 2025 9:27 AM February 27, 2025 9:27 AM

views 6

इथेनॉल मिश्रणाचं ध्येय २० टक्क्यांवर नेण्याचा भारताचा विचार

केंद्रीय पेट्रोलियम आणि भूगर्भ वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी इथेनॉल मिश्रणाचं ध्येय 20 टक्क्यांहून अधिक वाढवण्याचा विचार सुरु असल्याचं म्हटलं आहे. गुवाहाटी इथं ॲडव्हांटेज आसाम द्वितीय गुंतवणूक शिखर परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की देशात 19 पूर्णांक 6 टक्के इथेनॉल मिश्रणाचा दर आधीच गाठला आहे. विकासात्मक आव्हानं असली तरी, भारतातील सर्व जीवाश्म इंधन उत्पादन कंपन्या 2045 पर्यंत शून्य उत्सर्जन साध्य करतील अशी अपेक्षा असल्याचं पुरी म्हणाले.

January 24, 2025 7:51 PM January 24, 2025 7:51 PM

views 5

भारत ऊर्जा सप्ताह २०२५ हा जागतिक स्तरावरचा दुसरा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम असेल – मंत्री हरदीप सिंग पुरी

भारत ऊर्जा सप्ताह २०२५ हा जागतिक स्तरावरचा दुसरा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम असेल, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जवळपास १ लाख चौरस मीटरपेक्षा अधिक जागेत या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल आणि त्यात विविध सत्रांचा समावेश असेल, असंही ते यावेळी म्हणाले. 'भारताची अत्यंत यशस्वी 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना' या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असेल.    पुढच्या महिन्यात ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीत य...