May 6, 2025 1:19 PM May 6, 2025 1:19 PM
7
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते ‘गती’ कार्यक्रमाचं उद्घाटन
जागतिक पातळीवर प्रतिभावान व्यक्तींची मागणी मोठी असून ती पूर्ण करण्यासाठी भारत सिद्ध आहे, असा विश्वास परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केला. ते आज नवी दिल्लीत गती या कार्यक्रमाच्या उद्घाटन करताना बोलत होते. समकालीन युगात भारताचं मनुष्यबळ अधिक कार्यक्षम होण्यासाठी सरकारने कौशल्य प्रशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षणाचे विविध प्रयत्न सुरू केले असल्याचंही जयशंकर म्हणाले. पुढे ते म्हणाले, माझा थोडक्यात मुद्दा असा आहे की, जागतिक स्तरावर प्रतिभेला मागणी आहे आणि भारतात असे प्रतिभावान मुबल...