February 23, 2025 8:30 PM February 23, 2025 8:30 PM

views 5

सामाजिक न्याय या विषयावरच्या संवाद परिषदेचं उद्या नवी दिल्लीत उद्घाटन

सामाजिक न्याय या विषयावरच्या संवाद परिषदेचं उद्घाटन उद्या नवी दिल्लीत केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते होणार आहे. भारत ग्लोबल कोअलिशन फॉर सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने या संवादाचं आयोजन होत आहे. याच कार्यक्रमात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा ७४वा स्थापना दिनही साजरा करण्यात येईल. या कार्यक्रमात कौशल्य आणि रोजगार, सामाजिक सुरक्षिततेचा विस्तार, प्रशासन आणि सामाजिक न्यायासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावर चर्चा होणार आहे. 

January 20, 2025 9:41 AM January 20, 2025 9:41 AM

views 13

मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आज नवी दिल्ली येथे अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतील. संबंधित भागधारकांना अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम करणं हा परिषदेचा प्राथमिक उद्देश आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना औपचारिक सुविधा आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याबाबत सुमारे 150 हून अधिक सहभागी परिषदेत आपले विचार मांडतील.

December 22, 2024 1:32 PM December 22, 2024 1:32 PM

views 6

क्रीडामंत्री मनसुख मांडविय यांचा फिट इंडिया सायकल मोहिमेत सहभाग

केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी आज केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारत- तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांसोबत आज नवी दिल्लीत फिट इंडिया सायकल मोहिमेत भाग घेतला. मांडविया यांनी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम ते रायसीना हिलपर्यंत सैनिकांसोबत सायकल चालवली. देशभरात अकराशेहून अधिक ठिकाणी या मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सायकलिंग हा सर्वोत्तम व्यायाम असून  या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन मांडविया यांनी केले.

November 21, 2024 8:07 PM November 21, 2024 8:07 PM

views 4

क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाच्या कामगिरीसाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत क्रीडा विधेयक आणणार- डॉ. मनसुख मांडवीय

क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाच्या कामगिरीसाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत क्रीडा विधेयक आणणार असल्याची माहिती युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली. ते आज पाटण्यात आयोजित एका कार्यक्रमात खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींना संबोधित करत होते. देशाला क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट करण्यासाठी हे धोरण आखण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

November 18, 2024 8:43 PM November 18, 2024 8:43 PM

views 3

राष्ट्रीय युवक महोत्सव ११ आणि १२ जानेवारी २०२५ साजरा केला जाणार

राष्ट्रीय युवक महोत्सव पुढच्या वर्षी ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी विकसित भारत युवा नेतृत्व संवाद म्हणून साजरा केला जाणार आहे. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या मंचामुळे देशातल्या युवकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची आणि आपला दृष्टीकोन त्यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. देशभरातल्या युवकांमधून प्रतिभा शोधणं आणि तिचा विकास करणं हा यामागचा हेतू आहे, असं मांडवीय यांनी सांगितलं.