March 14, 2025 7:08 PM

views 8

ईशान्य भारत केशराचं केंद्र म्हणून उदयाला येईल-जितेंद्र सिंग

विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात ईशान्य भारत एक महत्वपूर्ण भूमिका बजावत असून हे क्षेत्र केशराचं  केंद्र म्हणून उदयाला येईल, असा विश्वास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केला आहे. सिंग यांच्या हस्ते आज शिलाँग इथल्या ईशान्य भारतासाठीच्या ‘तंत्रज्ञान अनुप्रयोग आणि प्रसार केंद्राचं’ उदघाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.  केंद्र सरकारच्या केसर अभियानाअंतर्गत  मेघालय, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात केशराच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असून  लवकरच नागालँड आणि मणिपूरमध्येह...

January 28, 2025 8:19 PM

views 10

CSIR विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका निभावतं-डॉ. जितेंद्र सिंह

नवोन्मेषी संशोधन, औद्योगिक आणि सामाजिक भागीदारी, क्षमता निर्माण, धोरण निर्मिती करून CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका निभावत असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह म्हणाले. लखनौ इथं CSIR च्या हिरक महोत्सवी समारंभाच्या उद्घाटनात ते आज बोलत होते. या संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास अतिशय गौरवशाली आहे, असे गौरवोद्गार जितेंद्र सिंह यांनी यावेळी काढले. तसंच  संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आव...

December 31, 2024 3:26 PM

views 9

2024 हे वर्ष अंतराळ विज्ञान क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण – डॉ. जितेंद्र सिंग

खासगी क्षेत्राच्या सहभागाने देशाला अंतराळ विज्ञान क्षेत्रात मोठा टप्पा गाठणं शक्य झालं, असं प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं थोड्या वेळापूर्वी ते  प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीने खासगी गुंतवणुकीला दारं उघडल्यामुळे अंतराळ मोहिमांना वेग आला असून गेल्या १० वर्षात या क्षेत्राने ९ टक्के दराने वाढ नोंदवली आहे असं ते म्हणाले. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित स्पेडेक्स ही इसरोची ९९ वी  मोह...

December 25, 2024 8:20 PM

views 12

राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रमाचं उद्घाटन

दीर्घकालीन आणि अर्थपूर्ण बदलासाठी शासनपद्धतीतल्या सुधारणांची सुरुवात तळागाळापासून व्हायला हवी, असं प्रतिपादन कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलं आहे. सुशासन दिनाच्या निमित्ताने सिंह यांनी आज विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रमाचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते.

December 25, 2024 12:48 PM

views 13

प्रशासन सुलभ करण्यासाठी सुमारे २००० कालबाह्य नियम आणि कायदे रद्द केले- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

प्रशासनाच्या कामकाजात सुटसुटीतपणा आणण्यासाठी तसंच ते जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी कालबाह्य झालेले सुमारे दोन हजार नियम काढून टाकण्यात आल्याची माहिती कार्मिक, नागरिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली आहे. सुशासन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित एका कार्यक्रमात ते काल नवी दिल्लीत बोलत होते.  

November 26, 2024 7:26 PM

views 10

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांची विविध क्वांटम स्टार्टअप्सची घोषणा

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत विविध क्वांटम स्टार्ट अप्सची घोषणा केली. काही निवडक स्टार्ट अप्स क्वांटम तंत्रज्ञानाच्या प्रमुख क्षेत्रांचं प्रतिनिधित्व करतील आणि यातून व्यापरिकरणाला चालना मिळेल असं ते म्हणाले. क्वांटम मिशनची अंमलबजावणी करणाऱ्या जगभरातल्या काही मोजक्या राष्ट्रांमध्ये भारत आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

November 21, 2024 10:53 AM

views 12

प्रतिरोधक संसर्गासाठी ‘नॅफिथ्रोमायसिन’ या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण

प्रतिरोधक संसर्गासाठी असलेल्या नॅफिथ्रोमायसिन या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्ली इथे केलं. जगभरात दरवर्षी 20 लाखांहून अधिक मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या औषध-प्रतिरोधक असलेल्या न्यूमोनिया आजाराविरूद्ध, नॅफिथ्रोमाइसिनची तीन दिवसीय उपचार पद्धती उल्लेखनीय ठरेल असं सिंग यांनी यावेळी सांगितलं.   मेड इन इंडिया असलेलं नॅफिथ्रोमायसिन अँटीबायोटिक हे जैवतंत्रज्ञान विभागाच्या बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन...

August 20, 2024 6:52 PM

views 8

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ४५ पदांसाठीच्या समांतर भरतीची जाहिरात रद्द

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेली ४५ पदांवरची समांतर भरतीची जाहिरात रद्द केली आहे. ही पदभरती रद्द करावी अशी विनंती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष प्रीती सुदन यांना केली होती. २०१४पूर्वी अनेक पदांवर अशाच प्रकारे भरती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पक्षपात झाल्याचे आरोप झाले होते. पद भरतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि राज्यघटनेने नमूद केलेल्या समानता आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांशी सुसंगत असणं आवश्यक आहे. उपेक्षित समाजातल्या पात्र उमेदवारांना सरकारी से...