October 20, 2024 1:34 PM October 20, 2024 1:34 PM

views 16

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आजपासून सात दिवसांच्या सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. सिंगापूरमधल्या दोन दिवसांच्या भेटीत प्रधान भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. ते उद्या सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग आणि उप प्रधानमंत्री गान किम याँग यांची भेट घेणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात धर्मेंद्र प्रधान त्या देशाचे शिक्षणमंत्री जॅसन क्लेअर यांची भेट घेणार आहेत. ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते सहभागी होणार आहेत.