May 20, 2025 1:31 PM May 20, 2025 1:31 PM

views 20

छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. मुंबईत राजभवन इथं झालेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते.  अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा ओबीसी नेता असावा यासाठी भुजबळ यांचा शपथविधी झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा  खात्याचाच पदभार दिला जाईल, अशी शक्यता वर्तवली...