April 8, 2025 8:18 PM April 8, 2025 8:18 PM

views 21

शेतीसंबंधी वादावर तोडग्यासाठी असलेल्या सलोखा योजनेला २०२७ पर्यंत मुदतवाढ

शेतीसंबंधी वादावर तोडगा काढण्यासाठी असलेल्या सलोखा योजनेला २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शेतजमिनीचा ताबा, वहिवाटी, कुटुंबातले वाद अशा प्रकरणावर सलोखा योजनेच्या माध्यमातून तोडगा काढला जातो. आतापर्यंत १ हजार ७ प्रकरणांवर यशस्वी तोडगा निघाला आहे. तसंच वादविवादावर कायमस्वरुपी तोडगा  काढण्यासाठी ८ कोटी ९९ लाख रुपयांची मुद्रांक सवलत महसूल विभागानं दिली आहे.  त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. 

March 10, 2025 8:21 PM March 10, 2025 8:21 PM

views 5

मुंबईतल्या बांधकाम क्षेत्राच्या तरतुदींचं उल्लंघन करणारी बांधकाम तोडण्याची घोषणा

मुंबईतल्या काही उपनगरांमध्ये बनावट नकाशे जोडून सीआरझेड आणि ना-बांधकाम क्षेत्राच्या तरतुदींचं उल्लंघन करणारी बांधकाम तोडण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेत केली. या प्रकरणात भूमी अभिलेख विभागातील दोघांचं निलंबन केल्याचंही बावनकुळे यांनी आपल्या उत्तरात सांगितलं. 

February 18, 2025 9:14 AM February 18, 2025 9:14 AM

views 5

सर्वसामान्यांना लाभ देणारी कुठलीही योजना बंद होणार नाही – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सर्वसामान्यांना लाभ देणारी कुठलीही योजना सरकार बंद करणार नसल्याचा पुनरुच्चार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते काल नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. काही योजनांचा लोकांनी गैरफायदा घेतला, त्याची तपासणी सुरू आहे. योजनांना पात्र असलेल्यांना लाभ निश्चित मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात काही बाबी प्रलंबित होत्या, त्याचं उत्तर सरकारनं दिलं असून, लवकरच या प्रकरणाचा निकाल लागेल आणि राज्य सरकार तातडीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घे...

January 23, 2025 8:10 PM January 23, 2025 8:10 PM

views 8

जनगणनेनंतर नवीन जिल्हे तयार करण्याचा निर्णय – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेला नाही. जनगणनेनंतर यासंदर्भातला निर्णय होऊ शकतो, असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. अनेक ठिकाणी नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तयार केलं जाईल, असं ते म्हणाले.  प्रत्येक आदिवासी पाड्यावर महिन्यातले काही दिवस अधिका-यांनी स्वतः प्रत्यक्ष जावं, पारधी समाजासारखे लाभार्थी जर शासनापर्यंत पोहोचू शकत नसतील तर संबंधित विभागानं त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देणं अभिप्रेत आह...

January 16, 2025 7:24 PM January 16, 2025 7:24 PM

views 12

शेत रस्ता बनवण्याबाबत तहसीलदारांना निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीत मोठ्या वाहनांचा वापर होतो, त्यामुळे वाहन प्रकारानुसार शेत रस्ता बनवण्याबाबत तहसीलदारांना निर्णय घेता यावा यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. शेत वहिवाट रस्त्याची तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. त्यानंतर, त्यावर अपील थेट उच्च न्यायालयात केलं जातं. त्याआधी मधली पायरी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता आलं पाहिजे, त्यानुसार नियमात सुधारणा कराव्यात, असं त्यांनी सांगि...

January 3, 2025 7:40 PM January 3, 2025 7:40 PM

views 5

राज्याचे वाळूधोरण १५ दिवसांत तयार करण्याचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार

साधारण १५ दिवसांत राज्याचे वाळूधोरण तयार करण्यात येणार असल्याचा निर्धार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. गौणखनिज आणि वाळूतस्करीसंदर्भात महसूल अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक घेतली आहे.   मागणी आणि पुरवठा यांच्यातील दरी कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. गौण खनिजांबाबतचे अधिकार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याचं त्यांनी सांगितलं.