September 30, 2025 6:59 PM September 30, 2025 6:59 PM

views 32

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हबच्या माध्यमातून विकासाला चालना मिळेल-चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हबच्या माध्यमातून ऊर्जा, पर्यावरण, आणि आरोग्य क्षेत्रात संशोधन, नवकल्पना व कौशल्य विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. या हब बाबत आज मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोज्त बैठकीत ते बोलत होते. हा हब ऑस्ट्रेलिया-इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. या माध्यमातून परदेशातले अभ्यासक्रम आणि विशेष कौशल्य प्रशिक्षण, तसंच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संधी उपलब्ध होईल,...

June 22, 2025 7:12 PM June 22, 2025 7:12 PM

views 7

व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण विद्यार्थिनींसाठी मोफत

व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण विद्यार्थिनींसाठी मोफत असल्यानं त्यासाठी कोणतंही शुल्क आकारू नये, असे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. विद्यार्थिनींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं आज बैठक झाली. यात मंत्री पाटील यांनी हे आदेश दिले. गेल्यावर्षी संस्थांनी शुल्क आकारलं असेल तर ते परत करण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्या. शुल्क आकारणीबाबतच्या समस्यांच्या निवारणासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने मदतक्रम...

September 15, 2024 6:21 PM September 15, 2024 6:21 PM

views 14

सोलापूरातील धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट

धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मागणी करत सोलापूर शहरात बेमुदत उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भेट घेतली. यावेळी माजी मंत्री प्रकाश शेंडगे हे देखील त्यांच्यासोबत होते. सरकार नेहमीच धनगर समाजाच्या पाठीशी असून या प्रश्नासंदर्भात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक बोलावली आहे, असं पाटील यांनी यावेळी सांगितलं. ‘धनगर’ आणि ‘धनगड’ ठरवण्याचा अधिकार आदिवासी आयोगाला आहे. तरीही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत न...