May 14, 2025 7:58 PM May 14, 2025 7:58 PM

views 69

उत्तरप्रदेशात सेमीकंडक्टर उत्पादन कारखाना सुरु करण्यास केंद्राची मंजुरी

उत्तर प्रदेशात जेवर विमानतळाजवळ सेमीकंडक्टर उत्पादन कारखाना सुरु करण्याचा प्रस्ताव आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. एचसीएल आणि फॉक्सकॉन या कंपन्यांबरोबरचा हा संयुक्त प्रकल्प असून त्यात ३ हजार ७०० कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे. देशभरातल्या २७० शैक्षणिक संस्थांमधे आणि ७० स्टार्टअप्समधे जागतिक दर्जाच्या आरेखन तंत्रज्ञानाविषयी नवीन संशोधन सुरु आहे, असं ते म्हणाले.

February 12, 2025 9:48 AM February 12, 2025 9:48 AM

views 5

‘लॅम रिसर्च’ कंपनी भारतात १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार – मंत्री अश्विनी वैष्णव

लॅम रिसर्च ही कंपनी भारतात 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. भारताच्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रवासातला हा आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प असल्याचं वैष्णव यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानाचा एक भाग म्हणून या उद्योगात गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जात आहे. भारताला सेमीकंडक्टर डिझाईन क्षेत्राचं जागतिक केंद्र बनवणं हा या अभियानाचा उद्देश आहे. लॅम रिसर्च ही अमेरिकन कं...

December 8, 2024 8:31 PM December 8, 2024 8:31 PM

views 10

कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून कामाचा आढावा

उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं होणाऱ्या महा कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १३ डिसेंबर रोजी प्रयागराजला भेट देणार आहेत. त्यादृष्टीनं तसंच कुंभ मेळ्याच्या तयारीच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज विविध कामांचा आढावा घेतला. कुंभमेळ्याच्या दृष्टीन सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्चाची विविध विकास कामं करण्यात येत आहेत. 

December 8, 2024 7:14 PM December 8, 2024 7:14 PM

views 47

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प संगमनेर मार्गावरच होणार

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा जुन्याच प्रस्तावित संगमनेर मार्गावरच होणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे. हा प्रलंबित प्रकल्प प्रस्तावित संगमनेर मार्गावरच व्हावा या मागणीसाठी  खासदार राजाभाऊ वाजे यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिल्याचं वाजे यांनी सांगितलं. महारेलनं या प्रकल्पासाठी आखलेल्या आराखड्यात, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील ठिकाणी रेल्वे मार्ग प्रस्तावित होता. वेळोवेळी पाठपुरावा करून ही बाब आपण ही...

October 17, 2024 8:36 AM October 17, 2024 8:36 AM

views 6

2025-26च्या हंगामासाठी रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ

रबी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली. ही वाढ 2025 - 26 या पणन हंगामासाठी आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती वार्ताहर परिषदेत दिली.   मोहरीच्या किमतीत सर्वाधिक 300 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली असून मसूर डाळींच्या किमतींत 275 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हरभरा डाळीच्या किमतीत 210 तर गव्ह...

September 6, 2024 12:46 PM September 6, 2024 12:46 PM

views 11

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची जपानच्या विविध खात्यांचे मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव सध्या जपानच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी जपानच्या विविध खात्यांचे मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. भारत आणि जपानमधली धोरणात्मक भागीदारी, डिजिटल व्यवहार, रेल्वे सेवा आदी मुद्यांवर या बैठकांमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली. जपानचे डिजिटल ट्रॉन्सफॉर्मेशन मंत्री तारो कोनो यांच्याशी वैष्णव यांनी भारत आणि जपानमध्ये डिजिटल व्यवहार अधिक व्यापक करण्याविषयी चर्चा केली. तसंच भविष्याच्या दृष्टीनं या क्षेत्रातल्या नवनवीन प्रयोगाविषयीही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झा...