March 21, 2025 1:45 PM March 21, 2025 1:45 PM

views 6

भारताची क्षयरोगमुक्त राष्ट्र बनण्यासाठी वेगाने वाटचाल – राज्यमंत्री अनुप्रिया पटेल

भारत येत्या वर्षात क्षयरोगमुक्त राष्ट्र बनण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे. देशात क्षयरोगाच्या प्रादुर्भावाचा दर २०१५ मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे २३७ होता, तो २०२३ मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे १९५ पर्यंत १७.७ टक्क्यांनी कमी झाला आहे, असं आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना आज त्या बोलत होत्या.   क्षयरोगाच्या रुग्णांना शोधण्यासाठी सरकारने ३३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या ३४७ जिल्ह्यांमध्ये १०० दिवसांची क्ष...

December 19, 2024 3:25 PM December 19, 2024 3:25 PM

views 5

वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रामध्ये विस्ताराची अफाट क्षमता – राज्यमंत्री अनुप्रिया पटेल

भारतातल्या वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रामध्ये विस्ताराची अफाट क्षमता आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं त्या वार्षिक आरोग्य परिषदेला संबोधित करत होत्या. भारतात वैद्यकिय उपकरणांचा व्यवसाय अंदाजे चौदा दशलक्ष डॉलर्स मूल्याचा आहे आणि तो वर्ष २०३०पर्यंत ३० दशलक्ष डॉलर्सपर्यंत जाईल  असं त्यांनी सांगितलं. वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्राच्या आशियाई बाजारपेठेत भारत चौथ्या स्थानावर आहे, असंही त्यांनी नमूद केलं.