January 27, 2025 1:17 PM January 27, 2025 1:17 PM
8
गृहमंत्री अमित शहा प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात सहभागी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले. त्रिवेणीसंगमावर स्नान केल्यानंतर ते पुरी आणि द्वारका इथल्या शंकराचार्यांची तसंच इतर संतांची भेट घेणार आहेत. दरम्यान, परवा २९ तारखेला मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्याता लक्षात घेऊन महाकुंभ मेळा क्षेत्रात वाहन प्रवेशाला बंदी आहे. गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसंच जास्त गर्दी होणार नाही याची खात्री करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण आणि सूचना केंद्र सक्रिय करण्यात आ...