March 4, 2025 6:30 PM March 4, 2025 6:30 PM

views 4

लाडकी बहिण योजनेचा दोन्ही महिन्याचा हप्ता ७ मार्चला जमा होईल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ मार्च रोजी सर्व लाभार्थ्यांना दिला जाईल. मार्च महिन्याचा हप्ता अर्थ खात्यातून निधी मिळाल्यानंतर देऊ, अशी माहिती महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधान भवन परिसरात दिली. २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी असल्याचं त्या म्हणाल्या. 

March 1, 2025 3:13 PM March 1, 2025 3:13 PM

views 4

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या. शहरी भागातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या योजनांसंदर्भातील प्रस्ताव सादर करावेत, महामार्गावरील जनसुविधा केंद्राच्या देखभाल तसंच व्यवस्थापनाची जबाबदारी महिला बचतगटांना देण्याबाबत तसंच या सुविधा केंद्रांमध्ये शौचालये, हिरकणी कक्ष, हस्तकला विक्री केंद्रे, अल्...

December 22, 2024 3:09 PM December 22, 2024 3:09 PM

views 7

पाच ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करताना ‘महाराष्ट्र’ देशात अग्रेसर – मंत्री अदिती तटकरे

भारत पाच ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करताना महाराष्ट्रही देशात अग्रेसर राहील, असं राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल जैसलमेर इथं केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली त्यावेळी तटकरे बोलत होत्या. यात २०२५-२६ च्या प्रस्तावित केंद्रीय अर्थसंकल्पातील निधी वाटप, दृष्टिक्षेपासह विविध मागण्यांवर राज्यांच्या अर्थमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. तटकरे यांनी महाराष्ट्रातील कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधांससह विविध विकास धोरणांबाबत शास...