July 11, 2025 3:25 PM July 11, 2025 3:25 PM

views 13

गिरणी कामगारांना घरं बांधून देण्यात येणार- उपमुख्यमंत्री

मुंबई शहर आणि परिसरात जिथे जागा उपलब्ध असेल, अशा ठिकाणी गिरणी कामगारांना घरं बांधून देण्यात येतील असा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत झाल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल  विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गिरणी कामगार संघटना प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत कामगारांना घरं देण्याबाबत विविध निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. शेलू इथली घरं घेण्यासाठी गिरणी कामगारांवर  कुठलीही सक्ती करण्यात आलेली नाही, हे सामं...