September 29, 2025 1:26 PM September 29, 2025 1:26 PM

views 23

गेल्या १० वर्षात दुग्धोत्पादनात वाढ

गेल्या १० वर्षात देशातल्या दुग्धोत्पादनात ६३ टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. १४ कोटी ६० लाख टनांवरुन ते २३ कोटी ९० लाख टनांपर्यंत पोहोचलं आहे. दुग्धोत्पादनाबाबत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. जगातल्या एकूण दुग्धोत्पादनापैकी एकचतुर्थांश उत्पादन भारतात होतं. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचा वाटा ५ ट्क्के आहे. आणि ८ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यातून थेट रोजगार मिळतो असं केंद्रीय दुग्धव्यवसाय विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. देशात दरडोई दुधाची उपलब्धताही ४८ टक्के व...

January 20, 2025 3:06 PM January 20, 2025 3:06 PM

views 6

बिना भेसळीचं दूध उत्पादन ही काळाची गरज – मंत्री पंकजा मुंडे

बिना भेसळीचं दूध उत्पादन ही काळाची गरज असून त्यासाठी या क्षेत्रातल्या संशोधकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नागपुरात केलं. माफसू अर्थात महाराष्ट्र पशू विज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात वॅन्कॉन अर्थात वर्ल्ड ऍनिमल न्यूट्रिशन कॉन्फरन्सच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या तीन दिवसीय परिषदेतून व्यावहारिक उपाय सुचवले जातील असं त्या म्हणाल्या.  जगामध्ये भारत सर्वात जास्त दूध उत...

November 27, 2024 9:57 AM November 27, 2024 9:57 AM

views 9

भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक असल्याचं मंत्री राजीव रंजन सिंह यांचं प्रतिपादन

भारत जगभरातला सर्वात मोठा दूध उत्पादक असल्याचं प्रतिपादन मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी काल दिल्लीतल्या कार्यक्रमात केलं. दिल्लीसह देशभरात काल राष्ट्रीय दुग्ध दिवस साजरा करण्यात आला. २०३० सालापर्यंत देशातलं पशुधन रोगमुक्त होण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगून रंजन म्हणाले की, पशुपालन व्यवसायाने देशाच्या आर्थिक विकासात मोठा हातभार लावला आहे. श्वेत क्रांतीचे पितामह म्हणवल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २६ नोव्हेंबर...

November 26, 2024 3:15 PM November 26, 2024 3:15 PM

views 6

‘येत्या १० वर्षात जगातल्या एकूण दूध उत्पादनापैकी एक तृतियांश उत्पादनाचा वाटा उचलण्याचं भारताचं उद्दीष्ट’

येत्या दहा वर्षात जगातल्या एकूण दूध उत्पादनापैकी एक तृतियांश उत्पादनाचा वाटा उचलण्याचं भारताचं उद्दीष्ट आहे, असं गुजराथ सहकारी दूध विपणन संघ म्हणजेच अमूल संघाचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना मेहता यांनी अमेरिकेनंतर आता युरोपात अमूल आपली ओळख निर्माण करण्याच्या तयारीत असल्याचं नमूद केलं. येत्या काळात दोन लाखांहून अधिक गावांमध्ये दूध सरकारी संघ स्थापन करायच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीची मेहता यांनी प्रशंस...

September 17, 2024 6:41 PM September 17, 2024 6:41 PM

views 15

गेल्या ९ वर्षात देशातल्या दूधउत्पादनात ५७ टक्क्यापेक्षा जास्त वाढ

गेल्या ९ वर्षात देशातल्या दूधउत्पादनात ५७ टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली असल्याचं, केंद्रीय मत्सोउद्योग, पशुपालन आणि दुग्धउत्पादन मंत्री राजीव रंजन सिंग यांनी सांगितलं. मत्सउत्पादनातही चांगली वाढ झाली असून त्याबाबत भारत दुसऱ्या स्थानावर आहे, असं ते म्हणाले. २०१३-१४ मधे देशातलं मत्सउत्पादन ९५ लाख टनापेक्षा जास्त होतं. ते २०२२-२३ मधे १ कोटी ७५ लाख टनाच्या वर गेलं. ही वाढ ८३ टक्के आहे, असं त्यांनी सांगितलं.

July 17, 2024 3:51 PM July 17, 2024 3:51 PM

views 8

दूध प्रक्रिया केंद्रांनी २० लाख लिटर दूधाचं संकलन करावं – मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

राज्‍यातला अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी अमूल उद्योग समुह तसंच इतर प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त २० लाख लिटर दूधाचं संकलन करावं असं आवाहन, दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलं आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रीया केंद्राच्‍या प्रमुखांच्‍या बैठकीत ते बोलत होते. या प्रक्रीया केंद्रानी सहकार्य केलं तर राज्‍यातल्या दूध उत्‍पादकांना ३५ रुपये भाव देणं शक्‍य होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.