October 23, 2024 8:40 PM October 23, 2024 8:40 PM

views 13

इफ्फी महोत्सवासाठी नावनोंदणी सुरू

येत्या २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत गोवा इथं होणाऱ्या ५५व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑस्ट्रेलिया ‘कंट्री ऑफ फोकस’ राहणार आहे. ऑस्ट्रेलियाची वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि ओळख दाखवणारे ७ चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जाणार आहेत. फिल्म बजार, संयुक्तरित्या चित्रपट निर्मितीच्या संधी, ऑस्कर पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर जॉन सीएल महोत्सवात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

June 21, 2024 8:24 PM June 21, 2024 8:24 PM

views 22

‘लाइफ इन लूम’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्रदान

१८व्या 'मिफ', अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोपाचा सोहळा आज मुंबईत सुरु आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. इतर क्षेत्रासह भारत चित्रपटांच्या क्षेत्रातही आघाडीवर आहे. भारतीय कलावंत त्यांच्या कामाद्वारे जगभरात पोहोचत असल्याचं प्रतिपादन मुनगंटीवार यांनी यावेळी केलं. त्यांच्या हस्ते उपस्थित कलाकारांचा सन्मान करण्यात आला. अभिनेते शेखर सुमन, अभिनेत्री छाया कदम, अभिनेता विशाल मल्होत्रा, दिग्दर्शक एमी बरुआ यांच्यासह इतर कलाक...