June 21, 2024 8:24 PM June 21, 2024 8:24 PM

views 22

‘लाइफ इन लूम’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्रदान

१८व्या 'मिफ', अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोपाचा सोहळा आज मुंबईत सुरु आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. इतर क्षेत्रासह भारत चित्रपटांच्या क्षेत्रातही आघाडीवर आहे. भारतीय कलावंत त्यांच्या कामाद्वारे जगभरात पोहोचत असल्याचं प्रतिपादन मुनगंटीवार यांनी यावेळी केलं. त्यांच्या हस्ते उपस्थित कलाकारांचा सन्मान करण्यात आला. अभिनेते शेखर सुमन, अभिनेत्री छाया कदम, अभिनेता विशाल मल्होत्रा, दिग्दर्शक एमी बरुआ यांच्यासह इतर कलाक...

June 17, 2024 3:53 PM June 17, 2024 3:53 PM

views 11

मिफ महोत्सवात ‘सामाजिक परिवर्तन करण्याची माहितीपटांची क्षमता’ या विषयावर चर्चासत्र

मुंबईत सुरु असलेल्या १८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज ‘सामाजिक परिवर्तन करण्याची माहितीपटांची क्षमता’ या विषयावर चर्चासत्र झालं. दिग्दर्शक टी. एस. नागभरण यांची मुलाखत डी. रामकृष्णन यांनी घेतली.   याशिवाय ‘माहितीपटांमधलं निर्मितीमधून महिलांचं भावविश्व’ या विषयावरही चर्चा सत्र झालं. याशिवाय विविध माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपट आज दाखवले जाणार आहेत.   

June 16, 2024 9:02 PM June 16, 2024 9:02 PM

views 24

१८व्या ‘मिफ’ महोत्सवाचा दुसरा दिवस उत्साहात पार

  १८व्या 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस भरगच्च कार्यक्रम आणि उपक्रमांसह पार पडला. माहितीपट क्षेत्रातल्या नवोदितांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या 'माहितीपट बझार'चं उद्घाटन 'दिल्ली क्राइम' या गाजलेल्या वेबसीरिजच्या निर्मात्या अपूर्वा बक्षी यांच्या हस्ते, महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या उपस्थितीत झालं.     विविध देशांचे, भाषांचे आणि विषयांवर...