February 15, 2025 3:39 PM February 15, 2025 3:39 PM

views 32

नांदेड, लातूर, यवतमाळ, सोलापूर आणि अमरावती विमानतळ लवकरच एमआयडीसी कडे

राज्यातली विमान सेवा आणखी तत्पर आणि सुकर करण्याच्या उद्देशानं नांदेड, लातूर, यवतमाळ, सोलापूर आणि अमरावती विमानतळ लवकरच शासन खाजगी कंपनीकडून एमआयडीसीकडे हस्तांतरित करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नांदेड आणि परभणीच्या दौऱ्यावर आले असताना सामंत यांनी विविध योजनांचा आढावा घेतला आणि बातमीदारांशी संवाद साधला.

December 30, 2024 2:46 PM December 30, 2024 2:46 PM

views 16

पालघरमध्ये एमआयडीसीमध्ये अग्नितांडव, ३ कंपन्या जळून खाक

पालघर जिल्ह्यात बोईसर-तारापूर एमआयडीसीमध्ये यू. के. अरोमेटिक्स अँड केमिकल या कंपनीत काल लागलेल्या आगीत ३ कंपन्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं.

July 31, 2024 6:48 PM July 31, 2024 6:48 PM

views 14

राज्यात एमआयडीसी उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

गडचिरोली जिल्ह्यातलं देसाईगंज, अहमदनगर जिल्यातलं लिंगदेव, नाशिक जिल्ह्यातलं कळवण-सुरगणा, जांबुटके आणि अमरावती जिल्ह्यातलं वरुड इथं एमआयडीसी उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसंच राज्यात यापुढे एमआयडीसी उभारण्यासाठी किमान शंभर एकर जमीनीची उपलब्धता करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातल्या त्यांच्या समिती कक्षात आज एमआयडीसी आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.    राज्याच्या ...