October 22, 2025 7:37 PM

views 26

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांची नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नागपूरच्या आकाशवाणी, दूरदर्शनच्या तसंच पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला.   अमरावतीमधल्या भारतीय जनसंचार संस्थेची बडनेरा इथली इमारत २ वर्षात पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले. बडनेरा इथल्या प्रस्तावित जागेची त्यांनी पाहणी केली आणि २०२७ चे शैक्षणिक सत्र इथेच सुरू होईल, या दिशेने कामं गतीमान करण्याचे आदेश दिले.

November 13, 2024 8:24 PM

views 9

मनोरंजन क्षेत्रातल्या नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध – संजय जाजू

गेमिंग, ऍनिमेशन आणि मनोरंजन क्षेत्रातल्या नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी सांगितलं. याचं हेतूने सरकारने आयआयसीटी अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजची स्थापना केली आहे, असं ते म्हणाले. हैदराबाद इथं इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्सच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते. आयआयसीटी ही संस्था सार्वजनिक-खासगी प्रारुपानुसार काम करेल. यात ५२ टक्के भागीदारी ही FICCI आणि CII ची तसंच ४८ टक्के भागीदारी सरकारची असेल असं जाजू यांन...