March 25, 2025 3:16 PM March 25, 2025 3:16 PM
3
Miami open: युकी भांब्री आणि नुनो बोर्जेस जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत, भारताच्या युकी भांब्री आणि पोर्तुगालच्या नुनो बोर्जेस यांच्या जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी चेकियाच्या ॲडम पावलासेक आणि युनायटेड किंग्डमच्या जेमी मरे या जोडीचा ७-६, ६-२ असा पराभव केला. त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना उद्या युनायटेड किंग्डमच्या लॉयड ग्लासपूल आणि ज्युलियन कॅश यांच्याशी होईल.