October 8, 2024 7:36 PM

views 23

म्हाडा सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी जाहीर

मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या २ हजार ३० सदनिकांच्या विक्रीसाठी अनामत रकमेसह प्राप्त १ लाख १३ हजार ८११ पात्र अर्जांची संगणकीय सोडत आज काढण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री  अजित पवार आणि इतर  मान्यवर उपस्थित होते. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली.

August 28, 2024 6:55 PM

views 29

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ‘म्हाडा शुभंकर चिन्हाचं’ अनावरण

म्हाडातर्फे मुंबईतल्या २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतल्या ३७० सदनिकांच्या विक्री किमती १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी केल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज दिली. सुलभ जनसंवादाच्या उद्देशाने म्हाडाने तयार केलेल्या शुभंकर चिन्हाचं अनावरण आज सावे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.  या सदनिका विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) आणि ३३ (७) तसंच ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून गृहसाठा म्हणून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे किमती कमी केल्याची माहित...

July 16, 2024 9:25 AM

views 36

छत्रपती संभाजीनगर येथे म्हाडाची आज संगणकीय सोडत

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत आज संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. १ हजार ४९४ गाळे,सदनिका, निवासी भूखंडाचा यात समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात येणार आहे.