October 10, 2025 3:40 PM October 10, 2025 3:40 PM
31
म्हाडाच्या ५,३५४ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी उद्या संगणकीय सोडत
म्हाडाच्या कोकण विभागातून विविध गृहनिर्माण योजनेतून उभारलेल्या सदनिका तसंच काही भूखंड विक्रीसाठीची संगणकीय सोडत उद्या उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे, वसई आणि पालघऱ जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या ५ हजार ३५४ सदनिका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओरोस आणि कुळगाव बदलापूर इथले ७७ भूखंड यासाठी १ लाख ८४ हजार ९९४ अर्ज आले आहेत. ठाणे इथल्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून होणार आहे. विजेत्या अर्जदारा...