November 4, 2025 8:10 PM November 4, 2025 8:10 PM

views 18

पेरू देशाची मेक्सिकोशी असलेले राजकीय संबंध तोडल्याची घोषणा

पेरू या देशानं मेक्सिकोशी असलेले राजकीय संबंध तोडल्याची घोषणा आज केली. मेक्सिकोनं पेरुचे माजी प्रधानमंत्री बेट्सी चावेझ यांना आश्रय देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पेरूनं ही घोषणा केली. चावेझ यांच्यावर  पेरुचे माजी अध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांच्या नेतृत्वात २०२२ साली झालेल्या बंडात सहभागी असल्याचा आरोप आहे. चावेज यांना आश्रय देण्याचा  मेक्सिकोचा निर्णय म्हणजे मैत्रीचा घात करणारी कृती असल्याचं पेरूचे परराष्ट्र मंत्री ह्यूगो डी झेला यांनी म्हटलं आहे.

November 2, 2025 5:03 PM November 2, 2025 5:03 PM

views 31

मेक्सिकोत झालेल्या स्फोटात २३ जणांचा मृत्यू, ११ जण जखमी

मेक्सिकोत सोनोरा मध्ये हर्मोसिलो इथल्या वाल्डोज सुपरमार्केटमध्ये काल झालेल्या स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले. ट्रान्सफाफॉर्मर चा स्फोट होऊन ही दुर्घटना झाल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अनेक जण अल्पवयीन असल्याच्या वृत्ताला सोनोराचे गव्हर्नर अल्फोन्सो दुराझो यांनी दुजोरा दिला आहे.

March 7, 2025 1:50 PM March 7, 2025 1:50 PM

views 16

कॅनडा, मेक्सिकोच्या आयातीवर कर लागू करण्याचा निर्णय अमेरिकेनं पुढे ढकलला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर बहुतेक वस्तूंवरचा २५ टक्के कर लागू करण्याचा निर्णय एक महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. त्यांनी काल ही घोषणा केली. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात कॅनडा आणि मेक्सिकोशी केलेल्या व्यापार कराराचं पालन करणाऱ्या वस्तूंना ही सवलत लागू होईल. मात्र, अमेरिकेच्या निर्यातीवर शुल्क आकारणाऱ्या देशांवर अमेरिका येत्या २ एप्रिलपासून आयात कर लागू करण्यावर ठाम असल्याचं ट्रम्प यांचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी स्पष्ट क...

March 4, 2025 1:48 PM March 4, 2025 1:48 PM

views 17

अमेरिकेची कॅनडा, मेक्सिको, चीनवर आयात शुल्क आकारण्याची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के तर चीनवर २० टक्के आयात शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क आजपासून लागू झालं आहे. कॅनडाने १५० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकी वस्तूंवर २५ टक्के कर लादणार असल्याचं म्हटलं आहे.   चीनने अमेरिकेच्या कृषी आयातीवर १० ते १५ टक्के कर लावण्याची घोषणा केली असून मेक्सिकोनेही प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला आहे. या करांमुळे कॅनडा आणि मेक्सिकोतून अमेरिकेत येणारे अंमली पदार्थ आणि स्थलांतरितांना आळा घालण्यासाठी अधिक कारवाई करता ये...

February 9, 2025 10:31 AM February 9, 2025 10:31 AM

views 16

दक्षिण मेक्सिकोमध्ये झालेल्या बस अपघातात 41जणांचा मृत्यू

दक्षिण मेक्सिकोमध्ये झालेल्या एका भीषण बस अपघातात सुमारे 41 लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त आहे. अपघात झाला तेव्हा ही बस कॅनकून आणि टाबास्को दरम्यान प्रवास करत होती. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

January 16, 2025 2:42 PM January 16, 2025 2:42 PM

views 13

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा मेक्सिकोचा जोडीदार यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत केला प्रवेश

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा मेक्सिकोचा जोडीदार यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर ६-४, ६-३ अशी सहज मात केली. बालाजी हा या स्पर्धेत टिकून असलेला एकमेव भारतीय टेनिसपटू आहे.

October 19, 2024 2:20 PM October 19, 2024 2:20 PM

views 9

भारत आणि मेक्सिको या दोन्ही देशात परस्पर संबंध बहुआयामी आणि दृढ होतील, असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास

भारत आणि मेक्सिको या दोन्ही देशात परस्पर संबध बहुआयामी आणि दृढ होतील, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. मेक्सिको इथं होत असलेल्या भारत-मेक्सिको व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढवण्यासाठी आयोजित ‘भारत-मेक्सिको व्यापार आणि गुंतवणूक शिखर परिषदेत’ त्या बोलत होत्या. मेक्सिको सिटीचे आर्थिक विकास मंत्री मानोला अलदामा हे देखील या परिषदेत सहभागी झाले होते. भारत देशात औषध निर्मिती, उत्पादन, आणि वाहन क्षेत्रात वाढ होत असून यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मुबलक संधी आहेत, असं अर्थमंत्री ...

October 16, 2024 3:01 PM October 16, 2024 3:01 PM

views 8

निर्मला सीतारामन उद्यापासून मेक्सिको आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन उद्यापासून मेक्सिको आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान मेक्सिको दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सीतारामन ‘टेक लीडर्स’ गोलमेज परिषदेचं अध्यक्षपद भूषवतील. या परिषदेच्या निमित्तानं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारतीय दिग्गजांसह या जागतिक स्तरावरचे अनेक तज्ज्ञ आणि उद्योजक एकत्र येत आहेत.   सीतारामन मेक्सिकोचे अर्थमंत्री रोगलिओ रामिरेझ दे लाओ यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेणार असून संसदीय सहकार्य बळकट करण्या...

September 18, 2024 7:48 PM September 18, 2024 7:48 PM

views 5

मेक्सिकोच्या सिनलोआ राज्यात उसळलेल्या हिंसाचारात जवळपास ३० जणांचा मृत्यू

मेक्सिकोच्या सिनलोआ राज्यात उसळलेल्या हिंसाचारात जवळपास तीस जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जवान शहीद झाले आहेत. हिंसाचार उसळलेल्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं मेक्सिकोचे संरक्षण मत्री लुईस क्रेसेनसियो सँडोवल यांनी सांगितलं. पोलिसांनी ३० संशयितांना अटक केली असून ११५ बंदुका जप्त केल्या आहेत. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन गटात संघर्ष उफाळून आल्यानंतर या हिंसाचाराला तोंड फुटलं होतं.