August 23, 2025 8:15 PM August 23, 2025 8:15 PM

views 11

गणेशोत्सवात मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर !

यंदाच्या गणेशोत्सवात मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा एमएमआरडीएने केली आहे. येत्या २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान  अंधेरी पश्चिम  आणि गुंदवली या मार्गिकांवरील मेट्रो गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार आहेत. या दोन्ही  स्थानकांवरून शेवटची गाडी ११  ऐवजी मध्यरात्री १२ वाजता धावेल. या काळात आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी गर्दीच्या वेळेत गाड्यांची वारंवारता अधिक असेल, तर रविवारी दर १० मिनिटांनी गाडी उपलब्ध असेल. 

January 19, 2025 9:12 AM January 19, 2025 9:12 AM

views 12

मुंबईत आता एकाच तिकिटावर लोकल, बेस्ट, मेट्रो आणि मोनो प्रवास करता येणार

सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या दृष्टीनं मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईतील एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीवर चर्चा करताना ते बोलत होते.   या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ 300 ते 500 मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, मुंबईत सध्या 3,500 लोकल सेवा कार्यरत आहेत.  ...

August 17, 2024 2:20 PM August 17, 2024 2:20 PM

views 13

ठाणे, पुणे आणि बेंगळुरूमधल्या मेट्रो प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशातल्या तीन नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांना काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज हा विस्तारित प्रकल्प; ठाणे रिंग मेट्रो आणि बंगळूरू मेट्रो प्रकल्पाचा यात समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठाणे एकात्मिक रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा अंदाजित खर्च १२ हजार २०० कोटी रुपये आहे. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गासाठी २ हजार ९५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून केंद्र सरकार, राज्य ...

August 17, 2024 2:18 PM August 17, 2024 2:18 PM