March 15, 2025 2:24 PM

views 19

देशाच्या उत्तर भागात हिमवृष्टी आणि पावसामुळे पारा घसरला, तर महाराष्ट्रात तापमानात वाढ

देशाच्या उत्तर भागात हिमवृष्टी आणि पावसामुळे तापमापकातला पारा घसरला आहे तर महाराष्ट्रात तापमानानं उच्चांक गाठला आहे. जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात काल संध्याकाळपासून पाऊस आणि हिमवृष्टी होत असून हवामान खात्यानं ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढच्या काही दिवसात अनेक भागात अधूनमधून पाऊस आणि हिमवृष्टी होईल. सोमवार पासून खोऱ्यातलं हवामान स्थिर होणार असून येत्या २४ मार्च पर्यंत परिसरातलं हवामान कोरडं राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. श्रीनगर मध्ये देखील आज हिमवृष्टी होणार असून काही ठिकाणी हलका ते मध्यम ...