December 4, 2024 10:18 AM December 4, 2024 10:18 AM
2
पुरुषांच्या हॉकी कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल
ओमान मधील मस्कत इथे सुरू असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने मलेशिया संघाचा 3-1 असा पराभव करत, स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारतातर्फे दिलराज सिंह, रोहित आणि शारदानंद तिवारी यांनी गोल करत संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिलं. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाशी होणार आहे.