February 20, 2025 1:34 PM February 20, 2025 1:34 PM

views 14

साखळी हॉकी स्पर्धा : जर्मनी विराेधातल्या सामन्यात भारताचा विजय

आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या वतीनं आयोजित साखळी हॉकी सामन्यांमध्ये भारतीय पुरूष संघानं काल रात्री जागतिक विजेत्या जर्मनीवर १-० असा विजय मिळवत मंगळवारच्या पराभवाची परतफेड केली. भारताच्या गुरजंत सिंगने सामन्यातील एकमेव गोल केला. भारतीय संघाचा उद्या आर्यलंडशी सामना होणार आहे.

January 25, 2025 2:55 PM January 25, 2025 2:55 PM

views 8

पुरुषांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेत तामिळनाडू ड्रॅगन्स आणि टीम गोनासिका यांच्यात लढत

पुरुषांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेत आज तामिळनाडू ड्रॅगन्सचा सामना टीम गोनासिका यांच्यासोबत होणार आहे. तर हैदराबाद तुफान्सची लढत यूपी रुद्रा यांच्यासोबत होणार आहे. सध्या गुणतालिकेत  तामिळनाडू ड्रॅगन्स १७ गुणांसह पहिल्या स्थानावर, तर हैद्राबाद तुफान १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.