September 17, 2024 7:13 PM
27
आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सलग पाचव्यांदा अजिंक्यपद
चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत, आज झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं चीनवर १-० असा विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली. भारताचं हे विक्रमी पाचवं आशियाई विजेतेपद ठरलं आहे. सामन्याची पहिली तीनही सत्र गोलशून्य बरोबरीत राहिली. त्यानंतर चौथ्या सत्रात भारताचा जुगराज सिंग यानं ५१व्या मिनिटाला सामन्यातला एकमेव आणि निर्णयक गोल करत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात चीननं भारताला चांगली लढत दिली मात्र, भारताचा गोलरक्षक क्रिषन पाठक आणि सुरक्षा फळीनं, चीनला यश मिळू दिलं नाही.