December 8, 2024 8:25 AM December 8, 2024 8:25 AM

views 9

१९ वर्षाखालील पुरुषांच्या आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश संघात अंतिम सामना

दुबई इथं सुरु असलेल्या १९ वर्षाखालील पुरुषांच्या आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात अंतिम सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडे दहा वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतानं उपांत्य सामन्यात श्रीलंकेला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला.