October 22, 2025 2:52 PM October 22, 2025 2:52 PM

views 15

फरार व्यापारी मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणाविरोधातली याचिका फेटाळली

फरार व्यापारी मेहुल चोकसीच्या भारतात प्रत्यार्पणाविरोधातली याचिका अँटवर्प इथल्या अपील न्यायालयानं आज फेटाळली. १३ हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी तो मुख्य आरोपी आहे. त्याचं नागरिकत्व हा त्याच्या भारतात प्रत्यार्पणात अडथळा नाही, असा निर्वाळा न्यायालयानं दिला. मेहुल चोकसीची याचिका न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता त्याच्यासमोर बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तो जर अयशस्वी झाला, तर बेल्जियम सरकार त्याचं भारताकडे प्रत्यार्पण करेल. भारतात आल्यानंतर ग...

October 18, 2025 3:12 PM October 18, 2025 3:12 PM

views 23

फरार हिरे व्यापारी मेहुुल चोकसी याची अटक योग्य असल्याचा बेल्जियमच्या न्यायालयाचा निर्वाळा

फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याला भारताच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी चोकसीला केलेली अटक योग्य असल्याचा निर्वाळा बेल्जियमच्या एका न्यायालयानं काल दिला. त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेतलं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. १३ हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोकसी आरोपी आहे. सीबीआयच्या विनंतीवरून अँटवर्प पोलिसांनी त्याला ११ एप्रिल रोजी अटक केली होती. आता ही अटक योग्य असल्याच्या निर्णयाविरोधात १५ दिवसांच्या आत बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. ...

April 17, 2025 8:04 PM April 17, 2025 8:04 PM

views 7

मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रसरकारची बेल्जियमसोबत चर्चा

बँक घोटाळ्यातला आरोपी, हिरेव्यापारी मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रसरकार बेल्जियमबरोबर चर्चा करत असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव रणधीर जयस्वाल यांनी दिली. नवी दिल्ली इथं आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. २६ - ११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण हा पाकिस्तानसाठी खणखणीत संदेश आहे,  या हल्ल्यातल्या इतर आरोपींना पाठीशी घालणं बंद करावं अशी समज पाकिस्तानला मिळाली आहे, असं ते म्हणाले.

April 14, 2025 1:53 PM April 14, 2025 1:53 PM

views 12

फरार हिरे व्यापारी मेहुल चौकसीला बेल्जियममध्ये अटक

सीबीआयच्या विनंतीवरुन फरार हिरे व्यापारी मेहुल चौकसी याला बेल्जियम पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. पंजाब नॅशनल बँकेतल्या साडे १३ हजार कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणी त्याच्याविरोधात मुंबईतल्या न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं होतं. याप्रकरणातला दुसरा आरोपी नीरव मोदीचं लंडनमधून प्रत्यार्पण व्हायचं आहे. घोटाळा उघड होण्याच्या काही दिवस आधी, जानेवारी २०१८ मध्ये तो देशाबाहेर पळून गेला होता.    चौकसी याची अटक हे मोठं यश आहे. गरीबांचे पैसे लुटणाऱ्यांना, हे पैसे परत करावेच लागतील, असं प्रधानमंत्...