August 11, 2025 1:19 PM August 11, 2025 1:19 PM

views 2

मेधा पाटकर यांच्यावरच्या मानहानी खटल्यात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावरच्या मानहानी खटल्यात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र, पाटकर यांच्यावरचा १ लाख रुपयांचा दंड न्यायालयाने रद्द केला आहे. २००१मध्ये दिल्लीचे तत्कालीन नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी पाटकर यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.   नर्मदा बचाव आंदोलनावेळी सक्सेना हे अहमदाबाद इथल्या एका स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख होते. २५ नोव्हेंबर २००० रोजी मेधा पाटकर यांनी सक्सेना हे हवाला प्रकरणात ...

April 25, 2025 2:33 PM April 25, 2025 2:33 PM

views 6

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मानहानी प्रकरणी अटक

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना मानहानी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज दिल्लीच्या निजामुद्दीन भागातून अटक केली. न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन न केल्यामुळे दिल्लीतल्या एका न्यायालयानं दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नावे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं.   त्यानंतर आज त्यांना अटक झाली आणि दिल्लीतल्या साकेत न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. पाटकर यांनी हमीपत्र दाखल करून नुकसानभरपाईची रक्कम जमा केल्यावर त्यांची सुटका करावी, असे आदेश साकेत न्यायालया...