September 10, 2025 1:46 PM September 10, 2025 1:46 PM

views 15

नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची काल बैठक घेतली. नेपाळमधील हिंसा ह हृदयद्रावक आहे. तिथल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं तसंच नेपाळच्या स्थिरता, शांती आणि समृद्धीचं महत्व आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशामधून अधोरेखित केलं.    नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा. जे नागरिक नेपाळमध्ये आहेत त्य...

April 23, 2025 8:14 PM April 23, 2025 8:14 PM

views 8

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू

पहलगाम इथल्या दहशतवादी  हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल उपस्थित आहेत.    या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले डोंबिवलीचे संजय लेले आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचं पार्थिव मुंबईत पोहोचलं आहे. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव मुंबईत आणि कौस्तुभ गणवते ...

March 9, 2025 6:26 PM March 9, 2025 6:26 PM

views 15

केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन तसंच निमलष्करी दल आणि गुप्तचर संस्थांचे उच्चाधिकारी यांच्यात बैठक

केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन तसंच निमलष्करी दल आणि गुप्तचर संस्थांचे उच्चाधिकारी यांच्यात आज जम्मूत बैठक होणार आहे. या बैठकीत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा घेण्यात येणार असून या बैठकीला जम्मू आणि काश्मीरमधले वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित असतील. जम्मूमधल्या सद्यपरिस्थितीचा आढावा घेऊन दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठीची रूपरेषा या बैठकीत आखली जाईल. केंद्रीय गृह सचिवांनी पदभार स्वीकारल्यानंतर जम्मू प्रदेशात केलेला हा पहिलाच सुरक्षा आढावा आहे.