September 15, 2024 2:56 PM
13
मेरठ इथं इमारत कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथल्या झाकीर कॉलनीत काल इमारत कोसळून झालेल्या अपघातानंतर सुरु केलेलं मदत कार्य आज सकाळी पूर्ण झालं. आज या ढिगाऱ्यातून ५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी हे मदतकार्य केलं. ही दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत १५ जण होते. अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मिना यांनी दिली. या अपघातातली मृतांची संख्या आता १० झाली आहे.