October 1, 2024 6:51 PM

views 12

राज्यातल्या ८ वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय आरोग्य विज्ञान विभागाची मान्यता

राज्यातल्या एकूण आठ वैद्यकीय महाविद्यालयांना अटी आणि शर्तीच्या अधीन राहून राष्ट्रीय आरोग्य विज्ञान विभागानं मान्यता दिली असून, याच सत्रापासून ही आठही महाविद्यालयं सुरू होणार आहेत. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.   या आठ वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रत्येकी १०० याप्रमाणे ८०० वैद्यकीय प्रवेशांमुळे देशातली एकूण प्रवेश संख्या एक लाख १६ हजार ६१२ एवढी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या दहा वर्षात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ब...

September 21, 2024 8:06 PM

views 14

गेल्या ४२ दिवसांपासून सुरू असलेला संप कोलकात्यातील आपात्कालीन सेवेतल्या डॉक्टरांकडून मागे

पश्चिम बंगालमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील कनिष्ठ डॉक्टर आपत्कालीन सेवेत रुजू झाले आहेत. गेले ४२ दिवस सुरू असलेला संप त्यांनी मागे घेतला. कोलकात्यातील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ हे कामबंद आंदोलन सुरू होते. मात्र या डॉक्टरांनी बाह्यरुग्ण सेवा सुरू केलेली नाही. त्यांचा लढा न्यायालयामार्फत सुरूच राहिल असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्य सरकारनं सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी दहा कलमी नि...

July 17, 2024 12:53 PM

views 14

गुजरातमध्ये 13 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कात मोठी कपात

गुजरातमधल्या 13सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करण्यात आली आहे. मंत्रीमंडळांच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. चालू शैक्षणिक वर्षात जीएमईआरएस महाविद्यालयामध्ये शुल्कवाढीसाठी सरकारने जारी केलेल्या अधिसुचनेला विद्यार्थी आणि राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.   गांधीनगरमध्ये याविषयी माहिती देताना गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषीकेश पटेल यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असून राज्य सरकारच्या 13 वैद्यकीय महाविद्यालयांतल्या 2100 जागांसाठ...