June 1, 2025 1:35 PM June 1, 2025 1:35 PM
14
देशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ठीक नसल्याची बसपाच्या प्रमुख मायावती यांची टीका
उत्तरप्रदेशासह देशभरात सामंतवादी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वर्चस्वामुळे जातीय भेदभाव आणि हिंसेसारख्या घटना घडत आहेत. यामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ठीक नाही हे दिसतं, असं बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटलं आहे. उत्तरप्रदेशाने देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, मात्र गुन्हेगारी आणि गरीबी यांच्या चर्चेमुळे राज्याची प्रतिमा डागाळली जाते असं त्या म्हणाल्या.