September 30, 2025 6:51 PM

views 44

नैऋत्य मौसमी पावसाचा राज्यातला परतीचा प्रवास…

नैऋत्य मौसमी पावसाचा राज्यातला परतीचा प्रवास येत्या काही दिवसात सुरू होईल. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत गुजरातच्या बहुतांश भागातून हा पाऊस परतला आहे. त्यानंतर ५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्रातून तर १० ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या बहुतांश भागातून मान्सून परत जाईल. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण देशातून मान्सून माघारीचा प्रवास प्रवास पूर्ण होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.