September 16, 2025 8:55 PM September 16, 2025 8:55 PM
18
मॉरिशसच्या प्रधानमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची भेट
मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांचं स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की भारताच्या शेजारी देशांप्रतिच्या धोरणात मॉरिशसचं स्थान खास आहे. दोन्ही देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असून ते धोरणात्मक भागिदारीत प्रतिबिंबित होत आहेत असं त्या म्हणाल्या. उभय नेत्यांमधे विविध विषयांवर चर्चा झाली. डॉ. रामगुलाम यांच्या ८ दिवसांच्या भारत दौऱ्याचा आज शेवटचा टप्पा होता. सकाळी त्यांनी राजघाट आणि सदैव अटल इ...