September 16, 2025 3:26 PM
24
मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. रामगुलाम आज राष्ट्रपतींची भेट घेणार
मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलाम आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांना भेटून त्यांनी चर्चा केली. आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रामगुलाम तिरुपती भेटीनंतर नवी दिल्लीत पोहोचले आहेत. आज सकाळी त्यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. नंतर त्यांनी माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सदैव अटल या समाधीवरही पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं. मॉरिशसच्या प्रधानमंत्र्याच्या भारत द...