January 29, 2025 10:17 AM January 29, 2025 10:17 AM
9
महाकुंभ : मौनी अमावस्येनिमित्त दुसऱ्या अमृतस्नानासाठी भाविकांची गर्दी
उत्तरप्रदेशमधील प्रयागराज इथं कुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त आज अमृतस्नानासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर आज संवाद साधला आणि महाकुंभमधील आजच्या नियोजनाचा तसंच सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. जनहितासाठी काही वेळापुर्वी आखाड्याचं स्नान रद्द करण्यात आलं आहे. गर्दीमुळे काही भाविक महिलांची प्रकृती खालावल्याचं वृत्त आहे. कुंभमेळा परिसरांत आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सात स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात कर...