June 24, 2024 7:20 PM June 24, 2024 7:20 PM

views 19

माथाडी कामगारांचा नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा

नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या माथाडी कामगारांनी आज नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला होता. कांदा बटाटा मार्केटच्या इमारतीचा पाणीपुरवठा खंडीत केल्याच्या विरोधात हा मोर्चा होता. बाजार समिती मधल्या अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा नवी मुंबई महानगरपालिकेनं खंडीत केला आहे. अतिधोकादायक गाळ्यांमध्ये दुर्घटना झाली तर जबाबदारी घेऊ, असं हमीपत्र लिहून पालिकेला द्यावं अशी सूचना महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी आंदोलकांना केली. हे हमीपत्र मिळाल्यानंतर मार्केटमधील पाणी पुरवठा सुरू केला जाईल...