May 10, 2025 8:29 PM May 10, 2025 8:29 PM

views 10

भारतात माता आणि बाल मृत्यूच्या दरात घट

शाश्वत विकास उद्दिष्ट २०३० ला अनुसरून, भारतात माता आणि बाल मृत्यूच्या दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया ने जारी केलेल्या अहवाला नुसार, देशात दर एक लाख बालकांच्या जन्मा मागे माता मृत्युदर १३० इतका होता. तो आता कमी होऊन ९३ वर आला आहे. बालमृत्यू दर २०१४ मध्ये ३९ होता, तो २०२१ मध्ये कमी होऊन २७ वर आला आहे. २०१४ मध्ये नवजात शिशु मृत्युदर प्रति १ हजार २६ इतका होता, तो २०२१ मध्ये १९ वर आला.   पाच वर्षां खालच्या बालकांचा मृत्युदर २०१४ मध्ये दर हजार जन्मांमागे ४५ होता, तो ...