December 21, 2024 2:47 PM

views 18

शरद पवार यांचं देशमुख कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे कुणी जबाबदार असतील, त्यांना तातडीनं धडा शिकवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी आज मस्साजोग गावाला भेट दिली आणि देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल, असं शरद पवार म्हणाले. जे घडलं त्यामुळे सर्वसामान्य लोकांना धक्का बसला असून या घटनेच्या खोलात जाऊन तपास करायची गरज त्या...

December 14, 2024 10:19 AM

views 31

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग

बीड जिल्ह्यात मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ही माहिती दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ‘‘संतोष देशमुख यांचं गेल्या सोमवारी नऊ डिसेंबरला अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या गुन्ह्यातील आरोपी जयराम माणिक चाटे तसंच महेश सखाराम केदार या दोघांना, १० डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीमधून तर अन्य एक आरोपी प्रतिक भिमराव घुले यास ११ डिसेंबर रोजी पुण्यातून अटक करण्यात आली.  ...