June 8, 2025 6:19 PM June 8, 2025 6:19 PM

views 14

‘स्टारलिंक’ कंपनीला भारतात काम करण्यासाठी परवानगी देण्याला माकपचा विरोध

उद्योगपती एलन मस्क यांच्या स्टारलिंक या कंपनीला भारतात काम करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी देण्याला मार्क्सवादी  कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला आहे. स्टारलिंक ही विदेशी कंपनी असून देशातल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विदेशी कंपनीच्या हाती सोपवल्याने सुरक्षेचं गंभीर संकट निर्माण होईल. त्यामुळे अमेरिकन एजन्सींना आपल्या दूरसंचार प्रणालीमधे आणि धोरणात्मक संभाषणांमधे हस्तक्षेप करता येईल,  अशी भिती माकपने व्यक्त केली आहे. यामुळे देशाचं आर्थिक नुकसानही होणार आहे, त्यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करावा...