March 31, 2025 7:03 PM March 31, 2025 7:03 PM
4
फ्रान्स नॅशनल रॅली पक्षाच्या नेत्या मरीन ले पेन यांना तुरुंगवासाची शिक्षा
युरोपियन महासंघाच्या निधीच्या अपहार प्रकरणात दोषी आढळल्यामुळे फ्रान्सच्या न्यायालयाने नॅशनल रॅली पक्षाच्या नेत्या मरीन ले पेन यांना पाच वर्षांसाठी निवडणूक न लढवण्याची तसंच तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पेन यांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्यांना पैसे देण्यासाठी युरोपियन संसदेच्या निधीतल्या ३३ लाख डॉलर्सपेक्षाही जास्त रक्कम वापरल्याचा आरोप आहे. पेन यांच्याशिवाय या प्रकरणात आठ जण दोषी आढळले आहेत. त्यामुळे नॅशनल रॅली पक्षाला २० लाख १६ हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.