August 19, 2024 10:15 AM August 19, 2024 10:15 AM
8
मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा
मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्कारासाठी प्राध्यापिका रोहिणी गोडबोले आणि डॉक्टर अजय सूद यांची, तर डॉक्टर कमला सोहोनी पुरस्कारासाठी डॉक्टर माधव गाडगीळ आणि डॉक्टर महताब बामजी यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड इथं 16 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत भरणाऱ्या 59व्या वार्षिक अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.