July 1, 2025 3:19 PM July 1, 2025 3:19 PM

views 21

मराठीच्या मुद्द्यावर शनिवारी मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे सहभागी होणार

राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संयुक्तपणे विजयी मेळावा घेणार आहेत.   दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकृत समाज माध्यमावर याविषयी माहिती दिली आहे. मुंबईत वरळी इथं येत्या शनिवारी आयेजित या विजयी मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.