June 30, 2025 3:30 PM June 30, 2025 3:30 PM
6
मराठीच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं
विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधान भवन प्रांगणातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दरम्यान, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. त्यानंतर सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, र...