February 6, 2025 7:25 PM February 6, 2025 7:25 PM
21
मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार या योजना पुन्हा सुरू केल्या जातील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार या योजना पुन्हा सुरू केल्या जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नांदेड इथं झालेल्या सभेत दिली. यासोबतच लाडकी बहीण योजनेसह महायुती सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचंही शिंदे म्हणाले. शक्तिपीठ महामार्ग जनतेवर लादला जाणार नाही, ज्याठिकाणी याला विरोध आहे, तिथं काम केलं जाणार नाही असं ते म्हणाले.