July 18, 2024 1:24 PM July 18, 2024 1:24 PM

views 10

पोलीस दल,खाणकाम आणि तुरुंग विभागातील सुरक्षा रक्षक पदांच्या थेट भरतीत अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देणार

पोलीस दल,खाणकाम आणि तुरुंग विभागातल्या काही पदांच्या थेट भरतीमध्ये हरियाणा सरकार अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देणार आहे.मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी काल चंडीगढ इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.   हरियाणाच्या पोलिस दलात कॉन्स्टेबल, खाण रक्षक, वनरक्षक,कारागृह वॉर्डन आणि विशेष पोलिस अधिकारी अशा पदांसाठी हे आरक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.ड गटातील पदांच्या भरतीत अग्निवीरांना वयात 3 वर्षांची सवलत दिली जाईल आणि पहिल्या तुकडीसाठी ही सवलत पाच वर्षांची असेल,असं त्यांनी ...

July 17, 2024 6:58 PM July 17, 2024 6:58 PM

views 15

मराठा-ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू – शरद पवार

राज्यात शांतता नांदावी यादृष्टीनं, मराठा-ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करू असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या समुदायांमधला वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती, मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना भेटून केली, त्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते. हा वाद निर्माण होण्यासाठी सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप पवार यांनी केला.   मराठा समुदायाचे मनोज जरांगे आणि ओबीसी समाजातर्फे आंदोलन करणारे लक्ष्मण हाके यांच्याशी सरकारच...

June 20, 2024 4:21 PM June 20, 2024 4:21 PM

views 12

‘मराठा, ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा’

मराठा आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामती इथं केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या समाजांच्या आंदोलनांमुळं सामाजिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारनं काळजी घ्यावी, असं पवार यांनी यावेळी सुचवलं.

June 13, 2024 7:28 PM June 13, 2024 7:28 PM

views 41

मनोज जरांगेंच उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी इथं सुरू असलेलं आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मंत्री शंभुराज देसाई, संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे.   सरकार सग्या सोयऱ्यांच्या कायद्याबद्दल सकारात्मक असून यावर एका महिन्यात निर्णय घेण्यात येईल, असं शंभुराज देसाई यांनी उपस्थित आंदोलकांना सांगितलं. तर सरकार १३ जुलैपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण करेल, अशी अपेक्षा मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.