December 12, 2025 8:21 PM December 12, 2025 8:21 PM
3
छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात दहा माओवाद्यांचं आत्मसमर्पण
छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज दहा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यात सहा महिला नक्षलींचा समावेश आहे. या सर्वांवर ३३ लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. माओवाद्यांनी त्यांच्याकडील एके-४७, दोन एसएलआर रायफल, एक स्टेन गन आणि एक बॅरेल ग्रेनेड लाँचर आदी शस्त्रं पोलिसांकडे जमा केली.