September 23, 2025 9:20 AM September 23, 2025 9:20 AM

views 15

छत्तीसगडमध्ये दोन माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये, नारायणपूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. दोघांवरही प्रत्येकी चाळीस लाख रुपयांचे बक्षीस होते. सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात केलेली ही कारवाई हा मोठा विजय असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

April 26, 2025 2:51 PM April 26, 2025 2:51 PM

views 7

मध्य प्रदेशच्या बालाघाटमधे चकमकीत चार महिला माओवादी ठार

मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत चार महिला माओवादी ठार झाल्या. त्यांच्या डोक्यावर ६२ लाख रुपयांचं बक्षीस होतं. सध्या या भागात सुरू असलेल्या माओवादविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई झाल्याची माहिती बालाघाटचे पोलीस अधीक्षक नागेंद्र कुमार सिंह यांनी दिली.

April 24, 2025 1:25 PM April 24, 2025 1:25 PM

views 4

छत्तीसगढमध्ये सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत ३ माओवादी ठार

छत्तीसगढ आणि तेलंगणाच्या सीमाभागात सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत आज ३ माओवादी अतिरेकी ठार झाले. बिजापूर जिल्ह्यातल्या कारेगुट्टा टेकड्यांच्या परिसरात माओवादी संघटनांचे म्होरके लपून बसले असल्याची खबर मिळाल्यावरुन संयुक्त शोध अभियान गेले २ दिवस सुरु आहे. छत्तीसगढ, तेलंगण आणि महाराष्ट्राच्या सुरक्षा दलांचं संयुक्त पथक ही मोहीम राबवत आहे. कारेगुट्टा टेकड्यांना सुरक्षा दलांनी वेढा घातला असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संयुक्त मोहीम असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.